विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ. धिरज अहिवळे यांना पी. एच. डी. पदवी

0
7

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ. धिरज अहिवळे यांना पी. एच. डी. पदवी बहाल
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.
धिरज अहिवळे यांना स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी तळेगाव आंबी पुणे या विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. ” सेमिक परफॉर्मन्स ऑफ स्ट्रक्चर अंडर व्हर्टिकल ग्राउंड मोशन” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांनी त्यांचे संशोधन डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. डॉ. धिरज अहिवळे हे या महाविद्यालयात गेली दहा वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, विद्याप्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळ तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग या सर्वांनी डॉ. धीरज अहिवळे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here