सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट…श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची भावनिक प्रतिक्रिया ..!

0
7

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट…श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची भावनिक प्रतिक्रिया ..!

बारामतीत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असताना श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत मतदारांचे आभार मानले आणि हा विजय आदरणीय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित असल्याचे सांगितले.
आपल्या संदेशात त्यांनी नमूद केले की, बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. निकाल जाहीर होत असताना अजितदादांच्या आठवणींनी सर्वजण भावूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत कोणत्याही प्रकारची मिरवणूक किंवा गुलाल उधळणे टाळण्याची विनंती केली.
सनित्रा पवार यांनी पुढे म्हटले की, “हा शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे.” बारामतीच्या विकासासाठी निर्धार, संघर्ष आणि नव्या विचारांनी काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत पुढील राजकीय दिशा कशी ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here