बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार यांचे आवाहन – “विजयाचा जल्लोष टाळा”
बारामती : बारामती पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या सध्या सुमारे 70,000…! मतांनी आघाडीवर असल्याचे समजते. सुमारे 98 टक्क्यांच्या आसपास मतदानाचा कल त्यांच्या बाजूने असल्याचेही बोलले जात असून, हा विजय ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची लाट सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, संभाव्य विजयाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. “हा विजय भावनिक आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जल्लोष करू नये,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. शांतता आणि संयम राखत निकाल स्वीकारावा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सुचवले आहे.
या भूमिकेमुळे त्यांच्या संवेदनशीलतेची आणि परिस्थितीची जाणीव असल्याचे अधोरेखित होत आहे.


