बारामतीत दि.८ सप्टेंबर२६ मंगळवार रोजी श्रीसंतश्रेष्ठ श्रीसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त बारामती तालुका नाभिक संघटनेचा भव्य कार्यक्रम;

0
22

८ सप्टेंबरला सर्व सलून चे दुकाने बंद राहणार…

बारामती : संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बारामती तालुक्यातील नाभिक बांधवांची सर्व सलून दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात येणार असून, दुकाने सुरू आढळल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता संत सेना महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व सत्यनारायण महापूजेने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत ह.भ.प. श्री. विजय चौधरी व ज्ञानेश्वर भजनी मंडळ, सूर्यनगरी बारामती यांचे भजन होणार आहे. सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत ह.भ.प. श्री. दत्तात्रय महाराज राऊत (तावशी), ता. बारामती, जि. पुणे यांचे कीर्तन होणार आहे.
कीर्तनास हार्मोनियम साथ ह.भ.प. श्री. विजय चौधरी सर, गायन साथ ह.भ.प. श्री. अशोक महाराज मोहिते व ह.भ.प. श्री. चोरमले महाराज यांची राहणार असून, मृदंगमणी म्हणून ह.भ.प. श्री. अनिकेत महाराज शिंदे सहभागी होणार आहेत. विशेष साथ ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, भाडळी बु., ता. फलटण यांची राहणार आहे.


दुपारी १२.१५ वाजता संतश्रेष्ठ सेना महाराज पुष्पवृष्टी कार्यक्रम, तर दुपारी १२.३० ते १ वाजता बारामती तालुका नाभिक संघटनेच्या सर्व माजी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत सर्व नाभिक बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम वीरभाई कोतवाल सोसायटी, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे येथे होणार आहे. तरी
सर्व नाभिक समाज बांधवांनी उपस्थित राहवे कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष रोहन शहाजी शिंदे, उपाध्यक्ष अजित सुभाष यादव, कार्याध्यक्ष अनंत नारायण आपुणे ,खजिनदार शिरीष मोहन काशीद ,सचिव आदेश संजय आपुणे, ओंकार भारत शिंदे व सर्व बारामती तालुका नाभिक संघटनेचे कार्यकारी पदाधिकारी माजी अध्यक्ष यांच्यावतीने दिनांक ८ सप्टेंबर मंगळवार रोजी होणाऱ्या श्री संतश्रेष्ठ श्रीसेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास सकल समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे कळवण्यात आले आहे


संत सेना महाराज पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी नाभिक बांधवांनी आपापली दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवून कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन बारामती तालुका नाभिक संघटनेने केले आहे. दुकान सुरू असल्यास दंड आकारला जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
“धर्म, समाज आणि एकजुटीसाठी नाभिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here