एमआयडीसी च्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार केंद्र सुरू..!

0
4

एमआयडीसी च्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार केंद्र सुरू..!

बारामतीकरांची आधारच्या कामांसाठी होणार मोठी सोय

बारामती : बारामती शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. MIDC बारामती पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, गुरुवार दि. ३ सप्टेंबर २०२६ पासून आधारच्या विविध सेवा नागरिकांना उपलब्ध झाल्या आहेत.
या आधार केंद्रामध्ये नवीन आधार नोंदणी, आधार कार्डमधील माहितीमध्ये बदल किंवा दुरुस्ती, मोबाईल नंबर लिंक अथवा अपडेट करणे, बायोमेट्रिक अपडेट तसेच आधार कार्डची प्रिंट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आधार कार्डशी संबंधित कामांसाठी नागरिकांना यापुढे दूरच्या ठिकाणी जाण्याची किंवा वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. MIDC पोस्ट ऑफिसमध्येच आधारची कामे होणार असल्याने नागरिकांची वेळ, पैसा आणि धावपळ वाचणार आहे.
आधार कार्ड हे आजच्या काळात विविध शासकीय योजना, बँकेची कामे, शैक्षणिक कामे तसेच इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळे MIDC परिसरासह बारामती शहर आणि आसपासच्या नागरिकांसाठी हे नवीन आधार केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
स्थळ : MIDC बारामती पोस्ट ऑफिस, बारामती, जि. पुणे – ४१३१०२.
नागरिकांनी या नवीन आधार सेवा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्ट ऑफिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय डाक विभाग — डाक सेवा, जन सेवा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here