Homeसंपादकीयमहाराष्ट्रात गोंधळ…तर दिल्लीत मुजरा …? !

महाराष्ट्रात गोंधळ…तर दिल्लीत मुजरा …? !

महाराष्ट्रात गोंधळ…तर दिल्लीत मुजरा …? !

भावनगरी संपादक : संतोष शिंदे
सह्याद्रीच्या
कडेकपारातून निखारे उमटविलेले ते मावळे त्यांचे आचरण त्यांचे विचार इतिहास विसरलात का काय… महाराष्ट्रातील जनतेचा राजकारण्यांना प्रश्न..

महाराष्ट्र वेगळ्या वळणावर काय राजकारण्यांनी -शूरवीरांच्या, कर्मवीरांच्या, धर्मवीरांच्या, संविधानिक महाराष्ट्राचा आत्ताच्या राजकारण्यांनी पार सुफळा साफ केलाय.. महाराष्ट्रात आपापसात गोंधळ घालीत जनतेला कर्मवणूक केल्याप्रमाणे बेताल वक्तव्य तर नुसते उष्टी आश्वासन तर नुसती पारावरची चर्चा प्रमाणे टीव्हीच्या दांडक्या यापुढे मनाला वाटेल असे बोलणे.. जनतेतून आदर नको का मिळेना कोणाला परंतु बेधुंद बादशाहीतील राजाप्रमाणे खाजगीत चर्चाप्रमाणे आरोपा प्रत्यारोप एकमेकांवरती बोलण्यातून चिकल फेक करण्याचे षडयंत्र सुरू आहे सध्या.. महाराष्ट्रात तू भूक मीही काही तरी भुंकतो ..भोहं.. .. भोहं करतो की असेच तर राजकारणी म्हणत.. नाहीत ना.. अशाच पद्धतीचा महाराष्ट्राचा राज्यकर्त्याकडून.. विरोधकाकडून.. राज्यकारभार सुरू असल्याचं सर्वसामान्य जनतेतून चर्चिले जात आहे “महागाई, बेरोजगारी, तर कुठे वरुणराजाने थरथराट घातलेलाचा अवकाळीचा प्रश्न महाराष्ट्रात काही भागात आहे .तर तरुणांच्या हाताला काम नाहीत , नोकऱ्या नाहीत, तर कुठे खाजगी कंपन्यातील विविध कंपन्यातील कामगार पिळवणूक होत आहे. हे व्हायला नको ,आज महाराष्ट्रात तील काही सुविधाचं सुविधा तर कुठे सुविधाचं तर कुठे अस्विधाचा अभाव.. महाराष्ट्रात आज कुठेतरी दूझ्या भावाचं राजकारण याच राजकारणामुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत नाही ना प्रश्न गंभीर होतो आहे. आत्ताच हा प्रश्न हाताळला तर बरे अजूनही वेळ गेलेली नाही नुसताच महाराष्ट्रात गोंधळ व दिल्लीत मुजरे करून ही महाराष्ट्राची रीत नाही हेही राजकारण्यांनी समजून घ्यावे नसता येणाऱ्या काळात अवघा महाराष्ट्र माझा… गर्जनाप्रमाणे उठतील तेव्हा पळताभुई राजकारण्यांना कमी होईल हे चित्र महाराष्ट्रात जनतेत निर्माण होत आहे.. त्यामुळे राजकारण्यांनी सावधतेचा पवित्र बाळगून पक्षाच्या विरुद्ध कामे करून किंवा या पक्षातून त्या पक्षात जाऊन किंवा आपली टिर बडवून याच्या आशीर्वादाने त्याच्या आशीर्वादाने मी ह्याचाच मी त्याचाच मी कुठेही जाणार नाही.. च्या आश्वासने हे यापुढे तरी महाराष्ट्रातील राजकारण्यांनी थांबवले तर बरे होईल नसता.. महाराष्ट्राचे वाटोळे.. व्हायला वेळ लागणार नाही.. राजकारण व राजकारणातील इतिहास पाहिला तर कधीही महाराष्ट्राला एकमेकातील राजकारण घातक ठरलेले आहे म्हणून महाराष्ट्राने व महाराष्ट्राच्या जनतेने त्या,- त्यावेळी जागृत झाल्याचे इतिहास आहे राजकारण्यांनी महाराष्ट्राला व महाराष्ट्रातील जनतेला वेगळ्या वळणावर नेऊ नये बस….!
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!!

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on