शेती ही आपली आई आहे त्यामध्ये जगात मागणी असलेली पिके निवडा व पैसे कमवा केळी पिकात चांगले उत्पादन तंत्र व जाती वापरल्यास त्याला जगात चांगली मागणी आहे वेनोझूवा मध्ये केळीचा सोळावा खोडवा शेतकरी घेतात व त्याची क्वालिटी पहिल्या पिकासारखीच असते असे मत श्री सचिन सातव

0
21

शेती ही आपली आई आहे त्यामध्ये जगात मागणी असलेली पिके निवडा व पैसे कमवा केळी पिकात चांगले उत्पादन तंत्र व जाती वापरल्यास त्याला जगात चांगली मागणी आहे वेनोझूवा मध्ये केळीचा सोळावा खोडवा शेतकरी घेतात व त्याची क्वालिटी पहिल्या पिकासारखीच असते असे मत श्री सचिन सातव नगराध्यक्ष बारामती नगर परिषद यांनी व्यक्त केले ते कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे रोटरी इंटरनॅशनल मार्फत आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते यावेळी व्यासपीठावर ठाण्याचे रो. डॉ. प्रतिभा गुप्ते, माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, रोटरीचे माजी अध्यक्ष सौ मनीषा कोंडस्कर, रो. संजय कुलकर्णी माजी अध्यक्ष साई गणेश हे होते पुढे ते म्हणाले गेल्या काही दिवसात जुन्नर येथील मार्केटमध्ये 120 कोटी रुपयांची टोमॅटोची उलाढाल झाली यावरच शेतकरी ची ताकत कळते. एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे चेअरमन राजेंद्र पवार यांनी अमेरिकेत जाऊन कृषी तंत्रज्ञान बारामती मध्ये आणले आहे त्याची माहिती घ्या व आपल्या भागात ते तंत्रज्ञान वाढवा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी केले प्रशिक्षणाच्या उद्देशाबाबत माजी अध्यक्ष सौ मनीषा कोंडस्कर यांनी सांगितले या दोन दिवसीय कार्यक्रमात शाश्वत शेती, अन्नप्रक्रिया, एल निनो काळात शेती व्यवस्थापन, कृषी व्यवसायासाठी कर्ज योजना व कृषी विज्ञान केंद्र फार्म भेट नियोजित असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले
बारामती रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री अतुल गांधी, सचिव श्री हर्षवर्धन पाटील, कृषी संकल्प सचिव श्री.राहुल बनकर यावेळी उपस्थित होते या प्रशिक्षणासाठी सात जिल्ह्यातून 100 शेतकरी हजर होते त्यामध्ये पुणे, रायगडचे प्रांतपाल नितीन ढमाले यांच्या प्रयत्नातून तसेच ठाणे पालघर नवी मुंबई चे प्रांतपाल नितेश जयवंत यांचे प्रयत्नातून आणि मुंबई आणि मुंबई उपनगर येथून राजीव राजपाल दुवा यांचे प्रयत्नातून शेतकरी उपस्थित होते. या उद्घाटन करिक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय दरेकर यांनी केले तसेच आभार श्री साई गणेश यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here