HomeUncategorizedमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी"भरगच्च' एस.टी तून प्रवास करून दाखवावा.. मगच आश्वासने द्यावेत…...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी”भरगच्च’ एस.टी तून प्रवास करून दाखवावा.. मगच आश्वासने द्यावेत… एस.टी प्रवासी..!

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ व एस.टी .बस प्रवास भयानक वास्तव्य…!

संतोष शिंदे संपादक भावनगरी बारामती:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी, कर्मचारीवर्ग, एसटी ड्रायव्हर, कंडक्टर कधी बदल होणार, का …. हे असेच सुरू राहणार .. जिथे कर्मचारीच असुरक्षितता तर मग विचार करायला नकोच तिथे सर्वसामान्य प्रवासी जनतेचा काय विचार कोण विचारतोय त्या प्रवाशांचे हाल – बेहाल.. मुख्यमंत्री म्हणतात ..महिलांना अर्ध तिकीट.. तर 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवास… ऐकून बरेही वाटले.. मात्र गोष्ट अशी आहे की तो प्रवास सुखाचा व सुखकारक असावा की नाही.. परंतु याकडे पाहतो कोण लक्ष कोणाचे आहे सर्व काही दुर्लक्षित आहे…!
अगोदर एसटी बसेस नीटनेटक्या कराव्यात-
ड्रायव्हरला सर्वप्रथम बस चालवताना बसच्या बद्दलसुरक्षितता वाटावी.. कंडिशन मध्ये असावी.. खडखड.. फडफड.. फडफड.. तडतड.. भर.भर..भर.. रं.. काय ते बसेसचे वेडेवाकडे आवाज गाडी तिथून तिथून कानठाळी बसेल असे आवाज… त्या.. त्या बसमध्ये जिथे बस ड्रायव्हरलाच बसता नीट येत नाही.. तिथे प्रवाशांचे काय.. एसटी बस मध्ये प्रवासी क्षमता किती, त्यामध्ये प्रवासी किती.. त्यात सुरक्षितता आहे कसली.. या अभ्यासाच्या गोष्टी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने विचारपूर्वक कराव्यात अशी प्रवासी महामंडळीतून.. प्रवास करणाऱ्या प्रवाश्यातून चर्चा ऐकावयास मिळत आहे.. तर अनेक बसेस मध्ये ठिकठिकाणी चे सद्यस्थितीला प्रवास करताना उदाहरण पाहावयास मिळत आहेत.. हे भयानक वास्तव चित्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बदल कधी व केव्हा घडवणार की असे सुरू राहणार….!?
आज अनेक ठिकाणच्या जिल्ह्यात तालुक्यात तर राज्यात विविध बस मध्ये प्रवास करताना जीव अनेक प्रवाशांचा मेकाकुटीस येतो आहे..!
एसटी प्रवास सुखकर प्रवास हे ब्रीद वाक्य एसटी महामंडळाचे पूर्वीपासून लागू आहे.
या ब्रीद वाक्याला कदाचित एसटी परिवहन मंडळ अंग काढून घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे..
विविध योजनांच्या बरोबर आता एसटीच्या मध्येही बदल झालेला पाहावयास मिळाला तर पाहिजे तरच त्या सुविधांचा आनंद घेता येईल .असे आमच्या भावनगरी या वृत्तपत्राशी बोलताना परवा शिर्डी वरून बारामतीला येताना काही प्रवाशांनी म्हटले.. कारण शिर्डी वरून अहमदनगर ला खूपच गर्दी त्याहून अहमदनगरहून बारामतीला येताना अक्षरशा 55 प्लस 55 प्लस 5 ते 10 एकूण शंभरच्या वर प्रवासी अशी खचाखच भरलेली बस… त्यात उन्हाळा.. त्यात एसटीचा भयानक आवाज.. अनेकांचे हृदयकोंडलेले वातावरण.. श्वास घ्यायला जागा नाही.. अनेक आजारांची साथ असताना विविध आजाराची लागण होण्याचे त्यातच पुन्हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनात उपस्थित होत असल्याने हे भयान वास्तव्य कधी बदलणार.. एसटी महामंडळ यामध्ये कधी सुधारणा करणार याकडे प्रवासी लक्ष वेधून आहेत..! तरी देव महाराष्ट्र परिवहन मंडळाला यावरून तरी सद्बुद्धी देवो हीच आशा करूयात बस….!!?

(बसमधील काही महिलेने म्हटले की..आधी महाराष्ट्र परिवहन मंडळाने एसटीबस ची संख्या वाढवावी.. महिला प्रवासी संख्या वाढत आहे.. त्यातच 75 वर्षीय जेष्ठ नागरिकांची प्रवासाची संख्याही वाढत आहे तर ड्रायव्हर कंडक्टर सोबत नवीन बस वाढवणे एसटी महामंडळाची जबाबदारी आहे का नाही? महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुविधाची घोषणा केल्यात स्पूर्ततेसाठी उपाययोजना हव्यात त्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने करण्यात याव्या अशी महिला वर्गातून चर्चा आहे ..तरच खऱ्या अर्थाने महिला सन्मान योजनेचा खरा सन्मान तेव्हाच होईल असे वाटते .अशी आमच्या भावनगरी वृत्तपत्राशी अनेक महिलांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या.! )

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on