बालगोपाळांच्या धमाल स्पर्धांनी रंगला सहकारनगरचा सार्वजनिक गणेश मंडळाचा गणेशोत्सव!

0
13

बालगोपाळांच्या धमाल स्पर्धांनी रंगला सहकारनगरचा सार्वजनिक गणेश मंडळाचा गणेशोत्सव!

बारामती : एमआयडीसी परिसरातील सहकारनगर सार्वजनिक गणेश मंडळाचा गणेशोत्सव यंदा भक्तिमय वातावरणासोबतच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. दररोज सकाळ-संध्याकाळ परिसरातील नागरिक तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. या काळात आयोजित विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते बालगोपाळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक खेळांचे. लिंबू-चमचा, तळ्यात-मळ्यात, स्लो सायकलिंग, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, बलून कॉम्पिटिशन, बॉल इन बकेट यांसह विविध स्पर्धांमध्ये मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धांमुळे गणेशोत्सवाच्या आनंदात चिमुकल्यांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता.
मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देतानाच त्यांच्यातील आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती, सामाजिक सहभाग आणि एकोप्याची भावना वाढविण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता बालगोपाळात भक्ती, संस्कार, मनोरंजन चा सुंदर मिलाफ ठरला.
गणेशोत्सवाच्या काळात आयोजित विविध कार्यक्रमांसोबतच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देत मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.


अध्यक्ष अजय भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन आणि आयोजन यशस्वीपणे पार पाडले.


अनंत चतुर्दशीला भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप
गणेशोत्सवाच्या बाराव्या दिवशी, अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने श्री गणरायाची उत्साहपूर्ण मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बालगोपाळ, मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधिवत गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
या संपूर्ण उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वेश सपकाळ, शिवराज शेळके, अथर्व भोसले, पवन वाघमारे, जीवन वाघमारे, ध्रुवराज कांबळे, श्रेयश वैद्य, कृष्णा रोहम, सुमेध सावंत, प्रसाद पितळे, शौर्य भोईटे आणि ऋतुराज कांबळे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleगुणवडीत सिंहगर्जना मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम; पारंपरिक ढोलपथकासह दहा दिवस अन्नदान
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here