Homeबातम्याबारामती बँकेला ६७ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन सचिन सातव

बारामती बँकेला ६७ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन सचिन सातव

बारामती बँकेला ६७ कोटींचा ढोबळ नफा

बारामती सहकारी बँकेने आर्थिक वर्षअखेरीस ३१ मार्च २०२४ अखेर ३५८४ कोटींचा व्यवसाय करीत ६७.४० कोटी रूपये तरतुदीपुर्व ढोबळ नफा प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन सातव यांनी दिली.

बँकेच्या आजवरच्या मिळालेल्या ढोबळ नफ्यामध्ये यंदाचा ढोबळ नफा विक्रमी असून, सर्व तरतुदी पुर्ण करीत बँकेने ५ कोटी ७० लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचे नक्त मुल्य १५४ कोटींवर पोहोचले असून बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली करत एनपीएचे (अनुत्पादक जिंदगी) प्रमाण कमी करण्यात यश प्राप्त केले आहे.

बँकेचे पुणे, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, रायगड अशा सहा जिल्हयांत कार्यक्षेत्र असून, बँकेच्या ३६ शाखा व एक विस्तारित कच आहे. ई टॅक्स, ई स्टॅपिंग, पॅन कार्ड, मोबाईल बँकींग, विमा सेवा, युपीआय पेमेंट या सुविधांसह आरटीजीएस, एटीएम सुविधा दिल्या जात असून, बँकेची स्वतःची संगणकीय प्रणाली विकसित आहे. नेट बँकिंगची सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच रिझर्व्ह बँकेकडून नेट बँकिंगची परवानगी मिळेल, असे अध्यक्ष श्री. सचिन सातव यांनी सांगितले.

उपाध्यक्ष श्री. किशोर मेहता, अॅड. शिरीष कुलकर्णी चेअरमन व्यवस्थापन मंडळ, संचालक श्री. रोहित घनवट, श्री. देवेंद्र शिर्के, श्री. उध्दव गावडे, सौ. नुपूर शहा (वडूजकर), डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, श्री. विजयराव गालिंदै, श्री. नामदेवराव तुपे, श्री. मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, श्री. जयंत किकले, श्री. रणजित धुमाळ, तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.), व्यवस्थापन मंडळातील सदस्य डॉ. अमोल गोजे, अॅड. रमेश गानबोटे, श्री. शांताराम भालेराव, कार्यकारी संचालक श्री. रविंद्र बनकर, मुख्य सरव्यवस्थापक श्री. विनोद रावळ, सरव्यवस्थापक श्री. सोमेश्वर पवार व श्री. विजय जाधव तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी यात सक्रिय सहकार्य केल्याचे अध्यक्ष श्री. सचिन सातव यांनी नमूद केले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on