बारामती न्यायालयाचा दुहेरी हत्याकांडात जन्मठेपेचा निकाल

0
10

बारामती न्यायालयाचा दुहेरी हत्याकांडात जन्मठेपेचा निकाल
बारामती, दि. २ जुलै : बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ यांनी दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रमोद ऊर्फ पप्पू अंकुश पवार (रा. वेणूनगर, वाकड, जि. पुणे) याला जन्मठेपेची (सश्रम कारावास) शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ₹५,००० दंड, तसेच कलम १७६ व १७७ अंतर्गत प्रत्येकी सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात ३० जुलै २०२० रोजी दौंड तालुक्यातील खुटबाव येथे महिला मनीषा जाधव आणि गुलचंद निकम यांची लाकडी काठी व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. गुन्ह्यानंतर आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना खोटे नाव सांगितल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
फिर्यादी पोपट बाबूराव कांबळे यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी बाजू मांडली. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बालाबाई देवीदास जाधव यांच्या साक्षीला न्यायालयाने महत्त्व दिले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सागर माने यांनी केला. तपासात पोलीस नाईक वेणूनाथ बोरे यांनी सहकार्य केले.

Previous articleधरती को स्वर्ग बनाऍंगे..
Next articleअहो सरकार, शेतकऱ्याच्या घामाची किंमत कधी देणार?
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here