Homeबातम्याबारामतीच्या अंतर्गत विकास कामांकडे नगर परिषदचे… लक्ष वेधले.. जाणार काय ..नागरिकांच्या विविध...

बारामतीच्या अंतर्गत विकास कामांकडे नगर परिषदचे… लक्ष वेधले.. जाणार काय ..नागरिकांच्या विविध मागण्या….!

बारामतीच्या अंतर्गत विकास कामांकडे नगर परिषदचे… लक्ष वेधले.. जाणार काय ..नागरिकांच्या विविध मागण्या….!

बारामतीच्या अंतर्गत विकास कामांकडे नगर परिषदचे… लक्ष वेधले.. जाणार काय ..नागरिकांच्या विविध मागण्या….!

बारामती शहराचा वाढता विकास व विस्तारीकरण व त्यातच नागरिकीकरण सपाट्याने वाढल्यास ने बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे होत आहेत परंतु आणखीही विकास कामाची गरज व प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या करिता नागरिकांतून मागणी खालील प्रमाणे बारामतीतील जुने व नव्याने उपस्थित झालेले प्रलंबित प्रश्न बारामती नगरपरिषद केव्हा मार्गी लावणार अशी माफक अपेक्षा बारामतीतील सुज्ञ नागरिकांना लागून राहिलेले आहे…!

१) गेल्या अनेक वर्षापासून मंजूर असलेले वाढीव हद्दीतील सूर्यनगरीला लागून संभाजीनगर या भागातील त्या आरक्षित जागेत उद्यान होणे आवश्यकता आहे. तशी मागणी ही बारामती नगर परिषदेला वारंवार प्रशासनाला करण्यात आल्याचे समजते आहे. आता तरी बारामती नगर परिषदेने या भागातील गेल्या अनेक दिवसाचे प्रलंबित उद्यान पूर्णत्वास न्यावे तशी मागणी जोर धरु लागली आहे !

२)वाढीव हद्दीतील जळोची, तांदुळवाडी, रुई हाद्दवाढीतील अंतर्गत रस्त्याची अर्धवट स्थितीतील कामे पूर्ण होणे गरजेचे..!

३) शहरातील विविध रस्त्यांना खड्डे डागडूजी करणे गरजेचे अनेक रस्त्यांना खड्डे पडल्याने व जास्तीचे गतिरोधक असल्यामुळे अनेकांच्या पाठीचे मणके मोडल्यांचा ,अपघात झाला होत आहेत यावरून आता तरी नगरपरिषदेने लक्ष देण्याची गरज माफक अपेक्षा आहे…!

४)शहरातील जुने शौचालय मुताऱ्या दुरुस्ती स्वच्छता शहरातील सर्वच भागातील होणे आवश्यक..!नवीन ही आताच मुताऱ्या व स्वच्छालय बाधण्यात यावे पुन्हा जागेची अडचण होऊ नये करिता हे महत्त्वाचे अशी ही अपेक्षा नागरिकातून व्यक्त होते आहे…!

५)रुईच्या वड्याचे दुरुस्ती स्वच्छता कामे होणे आवश्यक रुईच्या भागात विशेष मोहीम स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याची गरज येथील स्थानिक नागरिक आमच्या प्रतिनिधीशी बोलून दाखवतात तरी बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून रुईवाडी हद्दीतील विकास कामे वेगाने करण्याचा प्रयत्न बारामती नगर परिषदेने करावा अशी मागणी होत आहे !

६) जुन्या नगर परिषदेच्या ठिकठिकाणीच्या इमारतीत भाडेकरूसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे मुतार्यांची आवश्यता आहेत.तर काही नगरपालिकेच्या इमारतीमध्ये नाक दाबून बुक्क्यांचा मार मुताऱ्या प्रश्ननी सहन करावा लागत आहे त्या त्या गाळधारकांना भाडे करूना या प्रश्नाकडेही नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहेचं !

७) बारामती नगर परिषदेकडून पाणपोई , बारामती शहरात वाढीव हद्दीतील परिसरात ठिकठिकाणीच्या चौकात पिण्याच्या पाण्याची सोय होणे आवश्यक नागरिकांकरिता गरज दानशूर व्यक्तीकडून नगरपालिकेच्या माध्यमातून आव्हाने करून पाणीपोईचां प्रश्न मार्गी लावण्यासाठी बारामती नगरपरिषद नेते असे प्रयत्न करावेत ही नागरिकातून अपेक्षा …!

८) बारामतीच्या शहरातली जुन्या नगरपरिषदेच्या ठिकठिकाणीच्या इमारतींना कलर रंग रंगोटी होणे गरजेचे असल्याने तशी अपेक्षा त्या त्या परिसरातील गाळे धारकातूनही मागणी हतेय..!

९) बारामतीतील विविध रस्त्याच्या अतिक्रमणा संदर्भात विविध प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होणे व रस्ता रहदारी सुरळीत होण्याच्या करिता ट्राफिक च्या बद्दल विचार विनिमय होऊन त्यावर ॲक्शन व्हावी… करिता नगरपरिषदेच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा ! खास करून भिगवन रोड रिलायन्स मॉल च्या समोर सर्विस रोडचे संपूर्ण रस्ते रिंग रोडला होत चाललेली पथारीवाले यांची गर्दी वाढत आहे ट्रॅफिक जॅम होते करिता आताच कमी प्रमाणात आहेत तरच कारवाई झालेली चांगली नसता अतिक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारवाईचा बडगा.. आवशक लोकतून तशी मागणी केली जाते आहे !

१०) बारामतीच्या शहरास विदृपीकरण थांबवावे.. शहरातील विविध इमारतीवर लागणारे पोस्टर्स बॅनर्स कॉम्प्लेक्स त्यामुळे विद्रूपी करणाऱ्या वर कारवाई होणे आवश्यक बारामती येथील सुज्ञ नागरिक मागणी करताहेत ..!

११) सूर्यानगरी भागातील अंतर्गत रस्ते पूर्णत्वास नेणे गरजेचे.. अर्धवट स्थितीत असलेले डांबरीकरण रस्ते पूर्णत्वास होणे गरजेचे अनेक भागांतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे..!

१२) ज्या भागात पथदिवे स्टेटलाईट नाहीत तेथे बसवणे आवश्यकता अशी मागणी नागरिकांमधून होते आहे…!

१३) बारामतीतील प्रत्येक प्रमुख चौकात व रस्त्यांना गोलाकार चौक व डिव्हायडर होणे आवश्यक अशाह्याची मागणी नागरिकांमधून होते आहे…!

१४) बारामतीच्या अजून काही शहराच्या अंतर्गत ठिकठिकाणीच्या गल्लीत रस्त्यात रस्त्यांना काही भागात वृक्ष लागवड संगोपन मोहीम जोरदार सुरू करण्यात
यावे अशीही अपेक्षा मागणी केली जाते आहे !

१५) भिगवन रोड प्रमाणे मेडिकल कॉलेज, महिला रुग्णालय परिसरात भिगवन रोडला जो व्यायाम करिता व्यामाचे साहित्य बसवण्यात आली आहेत तशीच व्यामाची साहित्य त्याही भागात बसवण्यात यावेत यासाठी त्या भागातील नागरिक मागणी करताहेत…!

१६) बारामतीच्या ट्राफिक समस्येवर बारामती नगर परिषदेच्या वतीने एकत्रित समधीत प्रशासनाच्या माध्यमातून अधिक प्रबळ काम होणे आवश्यक..!

१७) बारामतीत गतिरोधक मोठ्या प्रमाणात झाले आहेत, ते नकोतच परंतु जेथे आहेत त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे तर लोकांच्या कंबर – पाठ दुखी होऊ नये करिता गतिरोधक त्या त्या प्रमाणात व्हावेत अशी अपेक्षा वाहन चालक मालक करत असतात …!

१८) तीन हाती चौकात रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर बसवणे आवश्यक वाटते..!

१९) महादेव मळा येथील पांढरीच्या महादेव मंदिर परिसरात व पाठीमागच्या भागात स्वच्छता होणे गरजेचे कारण त्या भागात.. त्या रिंग रोडला दुर्गंधी पसरली आहे …!

२०) पाटस रोडला डांबरीकरण खड्डे बुजवून आवश्यकता तसेच नेवसे रोड खड्डे बुजवणे व डांबरीकरण व्हावे सर्वत्र शहरातील प्रमुख रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम गरजेचे आहे..!

२१) हा रस्त्यावर संध्याकाळी भिकारी मागतकरी झोपतात त्यांच्यासाठी एखादे सांस्कृतिक ठिकाण व्हावे शहरात विकास आमटे यांचे वरोरा येथील आनंदवन प्रमाणे आपल्याही इथे आनंदवन करिता प्रयत्न बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून व्हावेत….!

२२)कसबा येथील संत सेना नगर मधील बोळीत काँक्रिटीकरण करणे गरजचे आहे..

२३)मेडिकल कॉलेज महिला हॉस्पिटल च्या आसपास सफाई होणे व वृक्ष संवर्धनासाठी काम होणे आवश्यक आहे . येथिल भागातील अंतर्गत रस्ते
२४) तांबे नगरला लागून असलेला रस्ता महिला सोसायटीमध्ये जाणाऱ्या रस्त्याला डांबरीकरण होणे आवश्यक

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on