काटेवाडी येथे पालखी सोहळ्यात वाहतूक कोंडी; तासभर वाहनचालकांची मोठी गैरसोय..!

0
26

काटेवाडी येथे पालखी सोहळ्यात वाहतूक कोंडी; तासभर वाहनचालकांची मोठी गैरसोय..!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान संबंधित प्रशासन गायब ..!

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त काटेवाडी परिसरात बुधवारी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅक्टर, चारचाकी आणि इतर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.


सुमारे तासभर वाहनचालकांना गाड्या पुढे-मागे करत मार्ग काढावा लागला. अनेक वाहनं रस्त्यावर अडकून पडल्याने प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प राहिली.
पालखी सोहळ्यादरम्यान योग्य वाहतूक नियोजन आणि पर्यायी मार्गांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here