HomeUncategorized२२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळ्यासाठी दत्ता कुंभार व त्यांच्या पत्नी...

२२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळ्यासाठी दत्ता कुंभार व त्यांच्या पत्नी सौ.पुष्पांजली यांना निमंत्रण…

२२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळ्यासाठी दत्ता कुंभार व त्यांच्या पत्नी सौ.पुष्पांजली यांना निमंत्रण...


22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळ्यासाठी दत्ता कुंभार व त्यांच्या पत्नी सौ.पुष्पांजली यांना निमंत्रण


अयोध्या येथे दिनांक 22 जानेवारी 2024 ला आयोजित ऐतिहासिक प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण बारामती चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीज चे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ न्यू दिल्ली चे माती कला विकास सेलचे राष्ट्रीय चेअरमन दत्ता कुंभार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पुष्पांजली कुंभार यांना श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र यांचेवतीने दिनांक 7 जानेवारीला मा.पोपटराव शिंदे यांचे शुभहस्ते व मा. मंगेश जी मासाळ, श्री अमोल जी देशमुख व श्री नवनाथ जी साळुंखे यांचे उपस्थित दत्ता कुंभार यांचे बारामती येथील निवासस्थानी त्यांचे संपूर्ण कुटुंबासमवेत देणेत आले. सदर सोहळ्यास दत्ता कुंभार हे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ ही कुंभार समाजाची देशव्यापी संघटना असून देशातील प्रत्येक राज्यात कार्यरत आहे. दत्ता कुंभार व त्यांची टिम ही गेले 10 वर्षेपासून कुंभार समाजातील तळागाळातील कुंभार काम करणारे कारागीरांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व माती कलेचा विकास यांवर काम करीत आहेत. खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकार यांचे वतीने राबविण्यात येणारे कुंभार सशक्तीकरण मिशन योजने अंतर्गत देशातील 35000 हून जास्त कुंभार कारागिरांना विजेवर चालणारी यांत्रिक चाके,चिखल मिळणी यंत्रे व आधुनिक माती कलेचे प्रशिक्षण देण्याचे मोलाचे काम दत्ता कुंभार यांचे नेतृत्वा खाली प्रजापती कुंभकार महासंघाने केलेले आहे. नुकतीच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पंतप्रधान विश्वकर्मा विकास योजना चालू करणेसाठीही प्रजापती महासंघाचे योगदान आहे.अखिल भारतीय स्तरावर काम करणारे कुंभार महासंघाला या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल संपूर्ण देशातील प्रजापती कुंभकार समाजामध्ये सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे व श्रीराम प्रभू न्यासाचे अभिनंदन ही होत आहे.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on