वीर सावरकर स्विमर्स क्लबच्या वतीने बारामतीत भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन

0
31

वीर सावरकर स्विमर्स क्लबच्या वतीने बारामतीत भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन
बारामती, दि. ८ जून : वीर सावरकर स्विमर्स क्लब, बारामती यांच्या वतीने भव्य जलतरण स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी वीर सावरकर जलतरण तलाव, अंबिकानगर, बारामती येथे होणार आहे.


स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील जलतरणपटूंना सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंडर-७ ते अंडर-१९ वयोगटांसह १९ ते ४० वर्षे, ४० वर्षांवरील गट तसेच दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. फ्री-स्टाईल, बॅक-स्ट्रोक, ब्रेस्ट-स्ट्रोक आणि बटरफ्लाय अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धा होणार असून, नवोदित तसेच अनुभवी जलतरणपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क एका इव्हेंटसाठी ४०० रुपये, दोन इव्हेंटसाठी ७०० रुपये आणि तीन इव्हेंटसाठी ९०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी दि. २६ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.


स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून इच्छुकांनी दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी व्यवस्थापक सुनील खाडे (८३०८४०८०४८) किंवा विकास शेळके (९४२२०८२४९६) यांच्याशी संपर्क साधावा.
बारामती परिसरातील जलतरणप्रेमी, खेळाडू आणि पालकांकडून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here