विद्या प्रतिष्ठान बारामती ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशनमध्ये वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली येथील प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी संपन्न

0
20

विद्या प्रतिष्ठान बारामती ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशनमध्ये वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली येथील प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन येथे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली यांच्या विनंतीवरून “इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि ऑटोमेशन” या विषयावर तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली येथील विविध विद्याशाखांचे विभागप्रमुख व प्राध्यापक अशा एकूण २३ प्राध्यापकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यांत्रिक अभियांत्रिकी शाखेचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. पी. आर. चित्रगार, यांचे हस्ते करण्यात आले. सेंटरच्या प्रभारी प्रमुख प्रा. प्राची काळे या प्रशिक्षण सत्राच्या समन्वयक होत्या. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ / प्रयोगशाळा सहाय्यकांनी परिश्रम घेतले आहेत. सिम्युसॉफ्ट कंपनीचे संचालक श्री. सुनील चोरे आणि त्यांच्या तंत्रज्ञांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here