HomeUncategorizedविद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मेकॅनिकल शाखेमार्फत ELYSIUM २०२३चे...

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मेकॅनिकल शाखेमार्फत ELYSIUM २०२३चे यशस्वी आयोजन…

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मेकॅनिकल शाखेमार्फत ELYSIUM २०२३चे यशस्वी आयोजन

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेमार्फत ELYSIUM २०२३ हि स्पर्धा २७ आणि २८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर व विभागप्रमुख डॉ. सचिन भोसले यांच्या प्रमुख उपस्थित प्रमुख पाहुणे श्री धनंजय जामदार, अध्यक्ष, बारामती इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयातील अशा ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मोठा संख्येने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लिंकद्वारे नोंदणी करण्याचे आव्हान आयोजकांमार्फत करण्यात आले होते. यामध्ये १. टेक हॅकाथॉन २. रोबो रेस चॅलेंज ३. शार्क टँक – स्टार्ट-अप ४. क्विझ ऑलिम्पियाड ५. गेम झोन (बुद्धिबळ, ब्लाइंड कोड, नंबर लिंक, एअरवेज ६. ऑटो-मेक (सॉफ्टवेअर सोल्यूशन्स) ७. ट्रेझर हंट अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या व त्यासोबत मनोरंजनासाठी हॅलोविन सेलिब्रेशन (रॅम्प वॉक आणि डान्स) आयोजित करण्यात आला होता.
ELYSIUM-23 चे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, नवीन शिकण्याची तसेच स्वतःला त्यामध्ये विकसित करण्याची संधी मिळावी, तसेच त्यांच्यामधील कल्पकता, कौशल्य, बुद्धिमत्ता व सर्जनशीलता या गुणांचा विकास व्हावा व उद्याचे नवनवीन तज्ञ व हुशार अभियंते तयार व्हावेत, त्यांच्यामध्ये एकात्मतेची भावना वाढावी हा होता. या कार्यक्रमाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ २८ ऑक्टो २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये प्रमुख अतिथी श्री सुरज पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, बारामती श्री. सागर नाझीरकर, सीईओ, मयुरेश्वर इंडस्ट्रीज, बारामती तसेच या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री. ज्ञानेश्वर मुटकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य अकादमी, बारामती, श्री. जतिन सुर्वे, व्यवस्थापक कमल बजाज चेतक बाईक, श्री. चेतन जाधव, विक्री प्रतिनिधी, श्री. सोमाणी, श्री. सुनील पवार, प्रतिनिधी, कृषीउत्पन्न बाजार समिती, बारामती. ह्युंदाई, बारामती या सर्वांच्या प्रमुख उपस्थित व प्रयोजकांच्या विशेष सहकार्याने सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे आणि प्रत्येक इव्हेंटमधील शीर्ष तीन विजेत्यांना सन्मान चिन्ह, रोख बक्षिसे देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमासाठी समन्वयक विपीन गावंडे, तसेच सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मागदर्शन लाभले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on