विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (KBIET) महाविद्यालयाला बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनची भेट – उद्योग आणि शिक्षण यांच्यातील सहकार्याची नवी संधी….!

0
32

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (KBIET) महाविद्यालयाला बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनची भेट – उद्योग आणि शिक्षण यांच्यातील सहकार्याची नवी संधी….!

बारामती : विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (KBIET) महाविद्यालयाला बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन (BIDA) च्या मान्यवर सदस्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान महाविद्यालयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, सेंटर ऑफ एक्सलन्स, तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तंत्रज्ञानाच्या संधींची सविस्तर माहिती घेतली.

औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वयाचा नवा अध्याय

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. धनंजय जामदार, सचिव श्री. अनंत अवचट, क्रेडाई अध्यक्ष दत्तात्रय बोराडे, आयएसएमटीचे माजी उपाध्यक्ष श्री. किशोर भापकर, अभिजित शिंदे, मनोहर गावडे, अंबरशहा शेख, मनोज पोतेकर आणि इतर मान्यवर सदस्यांनी या भेटीत सहभाग घेतला.

सर्वप्रथम मान्यवरांनी महाविद्यालयातील “सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट” – सौजन्य भारत फोर्ज प्रा. लि. या अत्याधुनिक प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रयोगशाळेतील नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती डॉ. ज्योती रंगोले आणि डॉ. बिपिन गावंडे यांनी उपस्थित सदस्यांना दिली.

यानंतर “सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड रोबोटिक ऑटोमेशन” ला भेट देण्यात आली. सिम्युसॉफ्ट कंपनीचे कर्मचारी, प्रयोगशाळेचे प्रमुख प्रा. दादासाहेब रुपनवर आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनीषा लांडे यांनी या सेंटरची सविस्तर माहिती दिली.

उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याबाबत सखोल चर्चा

महाविद्यालयाचे इंडस्ट्रियल अधिष्ठाता डॉ. रविंद्र पाटील आणि प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महाविद्यालय यांच्यातील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा घडवून आणली. औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एआय (Artificial Intelligence), IoT (Internet of Things) सारख्या नव्या तंत्रज्ञानांचा कसा उपयोग होऊ शकतो, यावर विचार मांडले.

उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय वृद्धिंगत करण्यासाठी संयुक्त कार्यशाळा आयोजित करणे, महाविद्यालय आणि बारामती औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये सामंजस्य करार (MoU) करणे, तसेच विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांसाठी चहा-नाश्त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या फलदायी चर्चासत्राची सांगता झाली.

महाविद्यालय आणि औद्योगिक क्षेत्राच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळेल, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होईल आणि उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. बारामतीतील उद्योग आणि शिक्षण क्षेत्र एकत्र येऊन भविष्यातील प्रगतीला गती देतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here