विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉग्निजन्ट या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ६.७५ लाख पॅकेजसाठी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड

0
14

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉग्निजन्ट या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ६.७५ लाख पॅकेजसाठी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉग्निजन्ट नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या शाखेत अंतिम वर्षात शिकणाऱ्या वेदांत संजय ढमाले या विद्यार्थ्याची ६.७५ लाख पॅकेजसाठी प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे.
यापूर्वी याच कॅम्पस प्लेसमेंटमधून १६ विद्यार्थ्यांची कॉग्निजन्ट या नामांकित कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे वार्षिक ०४ लाख रुपये पॅकेजच्या नोकरीसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी त्यांच्या अंतिम वर्षाच्या शिक्षणादरम्यानच निवडले गेले असून, त्यांनी पदवीपूर्व काळातच नामांकित कंपन्यांमध्ये सेवा करण्याचा मान मिळविला आहे.
आयटी क्षेत्रातील मंदी आणि नोकर भरतीमध्ये कपात असतानाही संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. ही माहिती संस्थेचे सेंट्रल टीपीओ डॉ. विशाल कोरे यांनी दिली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगत तांत्रिक वातावरण, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षकवर्गामुळे हे यश शक्य झाल्याचे नमूद केले. हा कॉग्निजन्ट कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी (टीपीओ) प्रा. सुरज कुंभार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. तसेच, प्रा. प्रदीप घोरपडे, प्रा. व्यंकटेश रामपूरकर, प्रा. संतोष करे, प्रा. मयूर गावडे, प्रा. शिवाजी रासकर, आणि चारुदत्त दाते यांनी देखील या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here