वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात…

0
2

वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात…

वालचंदनगर, दि. ५ जून : वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल राजाराम चौधर यांनी तब्बल ३७ वर्षे ४ महिने २९ दिवसांची प्रदीर्घ शासकीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
वालचंदनगर पोलीस स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रतिलाल चौधर यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनाभिमुख कार्याचा गौरव केला.


सत्कार सोहळ्यात चौधर यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या सेवाकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांशी सुसंवाद ठेवण्यासाठी केलेल्या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.
यावेळी बोलताना मान्यवरांनी चौधर यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत, त्यांची सेवा नव्या पिढीतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात सक्रिय राहून समाजासाठी योगदान देण्याच्या शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले होते. संपूर्ण सोहळा आपुलकी, कृतज्ञता आणि भावनिक वातावरणात पार पडला.

Previous articleअधिकमासानिमित्त ग्रंथ दिंडी व धर्मसभेसाठी काशी महास्वामीजींचे बारामती नगरीत आगमन
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here