HomeUncategorizedरामरक्षेची जागा आता Android ने घेतली...!

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली…!

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली...!

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली….
माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन….
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली…
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पीढ़ी आली…
अंगठे दुखतायत आता Type करून
मानसं भेटतायतं आता Skype वरुन…
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता…
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय…
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले ‘Connected’,
पण शेजारधर्म ‘Was Totally Disconnected’…
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
‘देव देव’ काय करता,पूजा करायचं पण App आलाय आता….
या ‘Technology’ मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता….
विसरले सारे चव आईच्या भाजीची,
शुर गाथा शिवाजीची,
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या ‘Technology’ ची…
तुळशी” ची जागा आता “Money Plant” ने
घेतलीय…!!
“काकी” ची जागा आता Aunt ने घेतलीय…!!
वडील जिवंतपणिचं”डैड” झाले,
अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले….??
भाऊ “Bro” झाला आणि बहीण “Sis”…!!
दिवसभर मुलगा CHATTING चं करत,
नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो…!!
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं “Mummy”
झाली…!!
घरची भाकरं आता कशी आवडणार हो… ५ रु. ची Maggi
आता किती”Yummy” झाली…!!
माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय….
बघा जमल्यास विचार करुन शेअर करा व
आपली संस्कृती.लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा प्रयत्न
करा …कोणी लिहले माहीत नाही पण सत्य आहे म्हणून प्रकाशित केले…!

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on