माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या आढावा बैठकीचे आयोजन

0
26

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या आढावा बैठकीचे आयोजन

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक (2025-2030) संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक रविवार, 2 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 वा. राष्ट्रवादी भवन, कसबा, बारामती येथे होणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार, माळेगाव साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे.

बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. श्री. राजवर्धन शिवाजीराव शिंदे (तालुका अध्यक्ष) व जयदादा पाटील (शहर अध्यक्ष) यांनी सर्व कार्यकर्त्यांना या महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

— प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here