महाआरोग्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन…

0
18

महाआरोग्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन

बारामती, दि. 7: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तालुका आरोग्य अधिकारी, महिला शासकीय रुग्णालय, सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालय, बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क आणि एनव्हायरोमेंट फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क येथे महाआरोग्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरात महिलांच्या स्तन कर्करोग व गर्भपिशवीच्या मुखाची तपासणी करण्यात येणार आहे. सीबीसी (हिमोग्लोबिन), एचबीए1सी (रक्तातील तीन महिन्याची साखर), टीएफटी (थायरॉईड) आणि रक्तातील कॅल्शियम तपासणी या मोफत रक्तचाचण्या करण्यात येणार आहे. तसेच छातीचा एक्सरे, क्षयरोग निदान, बोन मॅरो डेन्सिटी, इसीजी, पॅप सिमेअर, व्हीआयए, मॅमोग्रॉफी या विशेष चाचण्याही करण्यात येणार आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार करण्याबाबत सल्ला देण्यात येणार आहे. या शिबीरात मेहता हॉस्पिटल आणि हिंद लॅबचे सहकार्य करणार आहे.

या शिबीरात सहभागी होवून आरोग्य तपासणीचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here