भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश

0
28

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश

पुणे दि. २०: पुणे ग्रामीण जिल्ह्यात घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरुंचे नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, भाडे करारनामा, ओळखपत्र आदींबाबतची कागदपत्रे स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करावीत, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.

ग्रामीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने तेथे काम करणाऱ्या लोकांना घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल करण्यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घरमालकांनी ही माहिती पोलीस ठाण्याला सादर करावी. भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला न दिल्यास घरमालक हे भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here