
बीड दौऱ्यावर अजितदादा पवार; राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना.श्री. अजितदादा पवार यांनी आज पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड जिल्हा संपर्क कार्यालयाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले.
बैठकीस उपस्थित मान्यवर:
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. श्री. धनंजयराव मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री. अमरसिंह पंडित, बीड जिल्हाध्यक्ष मा. श्री. राजेश्वरआबा चव्हाण, आ. श्री. सतिशभाऊ चव्हाण, आ. श्री. विक्रमबप्पा काळे, आ. श्री. विजयराजे पंडित, माजी आमदार बाळासाहेब आजबे आणि संजयभाऊ दौंड यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत विविध विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आवश्यक प्रकल्प व योजनांवर सकारात्मक चर्चा झाली.
प्रमुख उपस्थित पदाधिकारी:
रमेशराव आडसकर, राजकिशोर मोदी, अशोकराव डक, बबनराव गवते, फारूकभाई पटेल, अमरजी नाईकवाडे, योगेश क्षीरसागर, शेख तय्यबभाई, अशोक हिंगे, बाजीराव धर्माधिकारी, प्रज्ञाताई खोसरे, विजय धायगुडे यांची यावेळी उपस्थिती होती.
या दौऱ्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.