बारामती स्पोर्ट फाउंडेशनचे ७ जवान आज रोजी २ जुलैच्या आयर्नमॅन स्पर्धेसाठी कझाकिस्तानला रवाना होणार..!

0
173

बारामती: (प्रतिनिधी) इंडियन रेल्वे सर्विसेस् राहुल पाटील
इंडियन फॉरेस्ट सर्विसेस् तुषार चव्हाण
इंजिनिअर राहुल मोकाशी
ग्रामसेवक मच्छिंद्र आटोळे
अल्ट्रा रनर सादिया सय्यद
क्रीडा शिक्षक अजिंक्य साळी
आर्किटेक्ट वैष्णवी ननवरे वरील हे ७ सदस्य ” कझाकिस्तान ‘ येथे फुल्ल आयर्न मॅन स्पर्धेसाठी आज बारामतीतील bsf चे जवान बारामती स्पोर्ट फाउंडेशन च्या माध्यमातून आयर्नमॅन स्पर्धेसाठी रवाना होत आहेत कझाकिस्तान येथे २ जुलै ला होणाऱ्या आयर्नमॅन २०२३ च्या अत्यंत खडतर असणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी बारामतीचे सुपुत्र अजिंक्य जनार्दन साळी यांच्या सह हे वरील ७ जन स्पर्धेसाठी आज २३ ला मार्गस्थ होणार आहेत.

आयर्नमॅन ही स्पर्धा अत्यंत खडतर समजली जाते. स्पर्धा जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये घेतली जाते. जगभरातुन अनेक परिश्रम घेऊन शरीराने कसलेले स्पर्धकच या स्पर्धेत सहभाग घेत असतात व त्यांचाच ठिकाव लागतो. या स्पर्धेत प्रामुख्याने खवळलेल्या समुद्रात ४ कि.मी. पोहणे, अत्यंत खडतर अशा चढउतारांनी भरलेल्या रस्त्यांवर १८० कि.मी. सायकलिंग करणे तसेच ४२ कि.मी. सतत धावणे अशा तीन खडतर प्रकारांचा समावेश आयर्नमॅन स्पर्धेत असतो.

या तीन्ही प्रकारच्या स्पर्धा सलग

१६ तासांत पूर्ण करायच्या असतात. कुठलीही विश्रांती न घेता एक एक आव्हाने पार करणे अनिवार्य असुन तरच स्पर्धा पुर्ण होते. सदर स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी वर्षभर अत्यंत कठिण व खडतर परिश्रम घ्यावे लागतात. त्यासाठी पुर्वी यशस्वीरीत्या आयर्नमॅन स्पर्धा जिंकणाऱ्या अनुभवी स्पर्धकांकडून आहार, शारीरीक व्यायाम, मनोबल वाढवणे, व आर्थिक नियोजन याविषयी मार्गदर्शन घेऊनच स्पर्धेत सहभाग घ्यावा लागतो.
कझाकिस्तान येथे होत असलेल्या स्पर्धेसाठी आज
बारामती शहरातुन आयर्नमॅन स्पर्धेसाठी २ जुलै २०२३ रोजी ७ जवान सहभागी होण्यासाठी आज शुक्रवार २३ जुन आज रोजी सकाळी ९.३० वा. प्रस्थान करणार आहेत.या स्पर्धेसाठी सहभागी होणारे अजिंक्य जनार्दन साळी सर बारामतीतील एका विनाअनुदानित
शाळेमध्ये सहशिक्षक पदावर ६ वर्षांपासुन कार्यरत आहेत. अजिंक्य साळी यांनी गेल्या ४ वर्षापासून जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त अखंड सुर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करीत आहेत. याच वर्षी सुर्योदय ते सूर्यास्त सलग १२ तास मंत्रोच्चारासह सूर्यनमस्कार घालुन “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये विक्रमाची नोंद केली आहे व तरूणांमध्ये एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.विविध स्पर्धेततून
अशा अनेक गोष्टी आपला शिक्षकी पेशा संभाळून अजिंक्य साळी यांनी खेळाची आवड जोपासत आयर्नमॅन स्पर्धेची जोरदार तयारी गेल्या एक वर्षांपासुन करत आहेत. त्यांना या स्पर्धेत उत्तम करण्यासाठी बारामतीचे सर्वात पहिले आयर्नमॅन पुरस्कार विजेते स्पर्धक सतिश ननावरे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभलेले आहे.तरी

त्यांना सदर स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ५ लाख रूपये गोळा करण्यासाठी त्यांनी सर्व खेळप्रेमी व नागरीकांना मदतीचे आवाहन भावनगरीच्या माध्यमातून विनंती करून केले आहे.

अजिंक्य साळी यांना आयर्नमॅन स्पर्धेत उत्तुंग यश मिळविण्यासाठी आपण शुभेच्छा तर देऊ या तसेच आर्थिक मदतीसाठी त्यांना फोन पे च्या माध्यमातुन आपल्याला इच्छा

असेल तेवढी रक्कम त्यांच्या खात्यावर थेट पाठवू या !! हि भावनगरी व अजिंक्य जनार्दन साळी सर

यांच्या वतीने नम्र विनंती.

Scan & Pay Using PhonePe App

● अकाऊंट डिटेल्स कॉसमॉस बँक

● खाते क्रमांक :- 01405010185219 • IFSC : COSB000014

● नाव :- श्री. अजिंक्य जनार्दन साळी

● फोन पे / गूगल पे नंबर : 9130959296. शक्य असेल तेवढी मदत साळी यांच्यासाठी करावी असे अहवाल भावनगरीच्या वतीने करण्यात येत आहे तरी
दि.२ जुलै रोजी कझाकीस्थान येथे फुल्ल आयर्न मॅन स्पर्धेसाठी BSF सदस्य हे बीएसएफ चे अध्यक्ष तथा बारामतीचे सर्वप्रथम आयर्न मॅन सतीश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जवान आयर्नमॅन स्पर्धेसाठी रवाना होत आहेत.
आप-आपल्या विविध कार्य क्षेत्रात पारंगत असून उत्तम आरोग्यदायी करिअरच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावत , ही सर्व मंडळी शारीरिक क्षमतेचा कस लागणाऱ्या कजाकिस्तान येथील आयर्न मॅन या स्पर्धेसाठी रवाना होत आहेत.
तरी, आपल्या बारामती करांच्या बीएसएफ च्या सदिच्छा आणि शुभाशीर्वाद घेऊन पुढील टीम मधील सदस्य खालील प्रमाणे
1)इंडियन रेल्वे सर्विसेस् राहुल पाटील
२)इंडियन फॉरेस्ट सर्विसेस् तुषार चव्हाण
३)इंजिनिअर राहुल मोकाशी
४)ग्रामसेवक मच्छिंद्र आटोळे
५)अल्ट्रा रनर सादिया सय्यद
६)क्रीडा शिक्षक अजिंक्य साळी
७) आर्किटेक्ट वैष्णवी ननवरे वरील सात सदस्य ” कजाकिस्तान ‘ येथे फुल्ल आयर्न मॅन स्पर्धेसाठी बारामतीतील bsf चे जवान आयर्नमॅन स्पर्धेसाठी रवाना होत आहेत.

अशी माहिती
बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन व सतीश ननवरे यांनी ही माहिती दिली आहे.तसेच वरील सर्वाचे मित्र परिवार व तमाम बारामतीकरांन कडून भावी आयर्न मॅन स्पर्धेसाठी जाणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. भावनगरी च्या वतीने सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here