बारामती येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम संपन्न

0
31

बारामती येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम संपन्न

बारामती, दि. १२: महसूल पंधरवड्यानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, भूमि अभिलेखचे उपअधीक्षक संजय धोंगडे, वन परिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, बारामती तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर तसेच माजी सैनिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या अवलंबितांना व शौर्य पदक धारकांना, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे, घर व शेतीकरीता जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेल्या समस्या, प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी सैनिकांकडून विविध विषयांबाबत १० अर्ज दाखल करण्यात आले असून या अर्जावर प्रशासनाच्यावतीने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन श्री. नावडकर यांनी दिले.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here