बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…..
बारामती: महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. २४ बुधवार रोजी सायंकाळी बारामतीतील वीरभाई कोतवाल हाऊसिंग सोसायटी येथे बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बारामतीतील
वीरभाई कोतवाल हाउसिंग सोसायटी येथे नव्याने उभारण्यात आलेला सभामंडप , श्री. संतश्रेष्ठ श्री .संतसेना महाराज मंदिरामध्ये अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरती व लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम.
अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटचे अधक्ष श्री जयदादा पाटील यांच्या उपस्थितीत केक कापून खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बारामती तालुका नाभिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बंधू आणि भगिनी यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे शहराध्यक्ष जयदादा पाटील यांनी उपमख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.आणि नाभिक समाज बांधवांचे कार्य कौतुकास्पद असून, कार्याबद्दलही तोंड भरून कौतुक केले. आनंद व्यक्त केला. व सर्वांना उपस्थितांना खाऊवाटप व केक वाटप करण्यात आला. विविध कार्यक्रम पार पडले.
बारामती तालुका नाभिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात वीरभाई कोतवाल हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी समाज बांधव भगिनी यांनीही उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.