बारामती :- बारामतीतील वीरभाई कोतवाल हाऊसिंग सोसायटी येथे सालाबाद प्रमाणे दि.९ /८/२०२४ शुक्रवार नागपंचमी निमित्त आयोजित नाभिक समाज बाधवांच्या मीटिंगमध्ये बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने
बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी सुधाकर माने यांची फेर निवड जाहीर करण्यात आली. तसेच सर्व कार्यकारणी ही जैसे थे ठेवण्यात आल्याचे या मीटिंगमध्ये ठरले.
सदर नागपंचमीच्या दिवशी सालाबाद प्रमाणे यावर्षीही बारामती तालुका नाभिक संघटनेच्या, समाज बांधवांनीं
या मीटिंगमध्ये समाज बांधवांचे साधक-बाधक प्रश्न त्यावरील निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले. या मिटींगचे अध्यक्षस्थानी सुधाकर माने होते.
वीर भाई कोतवाल हाऊसिंग सोसायटी येथे नाभिक समाज बांधवाची मीटिंग…
आयोजित कार्यकारणीच्या मीटिंगमध्ये नाभिक बांधवानीं एकत्रितपणे श्री. संतश्रेष्ठ श्री.संत सेना महाराज यांची पुण्यतिथी , पालखी सोहळा भजनी मंडळ, महाप्रसादाचे आयोजन,
श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नाभिक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर माने तसेच विश्वस्त नवनाथ आपुणे यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी संस्थेचे पदाधिकारी वर्ग व कर्मचारी….
करण्याबाबत तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध अडीअडचणी त्या,त्या प्रश्नावर चर्चा मसलत होऊन चर्चेला समाज बांधवांनी प्रतिसाद देत समाजाच्या अडीअडचणीवर तोडगा काढत समाजाचे हित जोपासण्याचा प्रोत्साहन पर कार्यक्रमाचे पुढील काळात निर्णय याबद्दल चर्चा विनिमय झाले. बारामती शहरातील सर्व व्यवसायिक नाभिक बंधू आजी-माजी संघटनेचे पदाधिकारी सल्लागार मार्गदर्शन तरुण फळीतील युवा कार्यकर्ते, वीर भाई कोतवाल हाऊसिंग सोसायटी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.