बारामतीत श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांना ब्लॅंकेट चे वाटप ….!

0
79

बारामती:-जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी निमित्ताने आलेल्या वारकरी भक्तांना ब्लॅंकेट वाटप करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते व युवा उद्योजक सनी बाबासाहेब गालिंदे यांच्यातर्फे इंदापूर चौक या ठिकाणी कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आलेला होते.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी निमित्ताने आलेल्या गरजू वारकरी भक्तांना ब्लॅंकेट वाटप ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब दत्तात्रय गालिंदे यांच्या वतीने तसेच प.पू.श्री दिलीप (आप्पा) खैरे जेजुरीचे प्रथम मानकरी यांच्या शुभहस्ते वारकरी भक्तांना ब्लॅंकेट वाटप इंदापूर चौक या ठिकाणी करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या वेळी कैलास ताडे,मिलिंद टिळेकर,अविनाश गालिंदे,सागर आगवणे,शामराव गालिंदे,अशोक कल्याणकर,भारत गालिंदे,हेमंत इंगुले, अशोक गालिंदे,राहुल इंगुले, सुनील गालिंदे,शामराव गालिंदे, सौरभ साळुंखे, श्रेणिक गालिंदे,गोकुळ गालिंदे, रघुवीर गालिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला तसेच सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गालिंदे यांनी केले आणि कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे व वारकरी भक्तांचे आभार कुणाल बाबासाहेब गालिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here