बारामतीत रहदारीस अडथळा ठरणाऱ्या १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई

0
17

बारामतीत रहदारीस अडथळा ठरणाऱ्या १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई

बारामती, दि.२: शहरातील प्याजो कंपनीसमोरील रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कंटेनर वाहने उभी करण्यात आल्याप्रकरणी प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्याजो कंपनीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, पोलीस उप अधीक्षक चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर संबंधित विभागाने कारवाई करत वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्यास यापुढेही कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

या संयुक्त कारवाईमुळे प्याजो कंपनी परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here