बारामती
बारामतीत नितीन चंदनशिवेंच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाला उस्फुर्त प्रतिसाद
बारामती : येथे कालकथित झुंबरलाल अहिवळे,कालकथित नानुबाई अहिवळे आणि कालकथित उषाताई अहिवळे यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त मानव एकता युवक संघटना,शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दुपारी १२ वाजता बुद्ध पूजापाठ व अन्नदानाचा कार्यक्रम आणि सांय ७ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते आणि विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.या दोन्ही कार्यक्रमाला बारामती तालुका आणि परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.
व्याख्याते नितीन चंदनशिवे यांनी आपल्या खास वकृत्वशैलीत विविध विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.तसेच अनुसूचित जातीतील उपवर्गिकरणाच्या विषयांवर भाष्य करत.त्यांनी उपवर्गिकरणाच्या षडयंत्राचा पर्दाफाश करून दोन्ही समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले.सोबतच शिक्षण ही काळाची गरज असून कोणत्या ही परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांना शिकवलच पाहिजे असा संदेश देखील त्यांनी दिला.

याप्रसंगी शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार,भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष ॲड.भाई विवेक चव्हाण,भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सचिन बनसोडे,माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, कैलास चव्हाण,शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढवाण पाटील,किशोर शिवरकर,नथुराम हाटे,आनंद थोरात,तैनूर शेख,ॲड.करीम बागवान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. सुशिल अहिवळे,शुभम अहिवळे, सिद्धार्थ लोंढे,संतोष लोंढे, नितीन गव्हाळे, सुरज अहिवळे,प्रा.रमेश मोरे,नानासाहेब साळवे,संजय शिंदे,रितेश गायकवाड,अमोल रणदिवे,किरण अहिवळे,भारत बगाडे,दिवेश अहिवळे,मुकेश अहिवळे,मनोज शिंदे,दत्तात्रय रणदिवे,सोमनाथ कदम,शेखर अहिवळे,विशाल घोडके यांनी परिश्रम घेतले.



