सहकार नगर परिसरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापनासाठी रहिवाशांचे निवेदन

0
10

सहकार नगर परिसरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापनासाठी रहिवाशांचे निवेदन

बारामती : सहकार नगर परिसरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची नियमित आणि योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. याबाबत रहिवाशांनी एमआयडीसी विभागाकडे सामूहिक निवेदन साद केले आहे.
परिसरातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता तसेच डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
रस्ते, गल्ल्या व सार्वजनिक ठिकाणी नियमित साफसफाई करणे आवश्यक असून नागरिकांच्या आरोग्याचा व परिसराच्या स्वच्छतेचा विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
रहिवाशांच्या प्रमुख मागण्या :
सहकार नगर परिसरातील कचरा दररोज नियमितपणे उचलण्यात यावा.
आवश्यक ठिकाणी कचरापेट्या उपलब्ध करून देण्यात याव्यात.
रस्ते, गल्ल्या व सार्वजनिक ठिकाणी नियमित साफसफाई करण्यात यावी.
ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था करावी.
कचरा साठवण्याच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवावी.
आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी.
कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक कर्मचारी व वाहने नियमितपणे उपलब्ध करून द्यावीत.
भविष्यात परिसरात कचरा साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी व नियमित व्यवस्था करावी.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा सहकार नगरमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

Previous articleबारामतीत नितीन चंदनशिवे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाला उस्फुर्त प्रतिसाद
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here