Homeसंपादकीयबारामतीच्या शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक ,तर सिग्नल बंद या जटिल समस्यावर बारामतीकर मात्र...

बारामतीच्या शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक ,तर सिग्नल बंद या जटिल समस्यावर बारामतीकर मात्र हैराण….

बारामतीच्या शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक ,तर सिग्नल बंद या जटिल समस्यावर बारामतीकर मात्र हैराण….

भावनगरी- संपादक संतोष शिंदे

बारामतीच्या नगरीत दिवसेंदिवस वाढत आहे ट्रॅफिक जाम…
यावर उपाय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बारामतीच्या शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम,सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे . २००९ ते २०२४ पर्यंत या वरील जटिल समस्यावर बारामतीकर मात्र हैराण झाले आहेत. अधिकत्ततर दंड भरून वाहन चालक मालक प्रशांत झालेले आहेत.

त्पतेने आजमितीला तरी होणाऱ्या बारामतीच्या शहरातील प्रमुख रस्त्यामधील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे ती सुरू करण्याची मागणी होत आहे.
नुसते सिग्नल सुरू करून चालणार नाही तर ट्रॅफिक समस्यावर उपाययोजना करण्यात आली पाहिजे.
संम्बधीत प्रशासनाने याकडे विशेष कृतीशील लक्ष वेधून घेण्याची तयारी करण्यात आली पाहिजे ट्रॅफिकचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जनतेतून अशी मागणी करण्यात येत आहे.

बारामतीची वाढती लोक संख्या, रहदारी या मूळ कारणास्तव अनेक समस्या शहरात,तर वाढीव हद्दीतील परिसरात वाढतच आहेत . बाहेरगावावरून बारामतीत आलेले लोक, शिक्षण,नोकरी,व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसायच्यां अश्या विविध कारणाने बारामतीत वास्तव्यात आहेत .
त्यामुळे शहरतील विविध भागात नागरिककिकरन अगदी झपाट्याने वाढत चाललेले आहे.या वाढत्या नागरीकरणामुळे शहराला पाणीपुरवठा , वीजपुरवठा,रस्ते दळणवळणाची सुरळीत साधने पुरवणारे , ट्रान्सपोर्ट, रुग्णसेवा, बाधकाम व्यवसाय मोल मजूर करणारे, कष्टकरी, शेतकरी, मॉल, हॉटेल, कंपनिज, विविध प्रकारचे व्यावसायिक,अभ्यासक्रमासाठी आलेला वर्ग , मोठ्याप्रमाणात स्थायीक झाले आहेत. यामुळे पूर्वीचे शहरातील विविध चौकात आता गर्दी वाढत चाललेले असताना बाजारीकरण,व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आलेला वर्ग मोठ्याप्रमाणात स्थायीक झाले आहेत यावरून स्पष्ट होते की शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम झालेले आहेत.ट्रॅफिक जाम होणारच रस्ते शहरात ठिकठिकाणी अपुरेच आहेत.पूर्वीपासून ट्रॅफिक समस्येवर विशेष कृतीशील लक्ष देण्याची आवश्यकता होती मात्र या जटिल समस्यावर उपाययोजना करण्यात आली नाही.आता पुन्हा वाढती लोक संख्या वाढत चाललेले बारामतीचे शहर वाढत चाललेले रहदारी शहराच्या रस्त्यावर डोकेदुखी ठरत आहे. पुन्हा एकदा बारामतीचे प्रांतधिकारी, तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तालुका व शहर पोलीस प्रशासन,परिवहनधिकारी ,या सर्वांनी एकत्रित येऊन बारामतीच्या शहराच्या ट्राफिकच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या करिता उपाय योजना त्वरित करण्याची मागणी संबंधित सुज्ञ बारामतीकरांकडून होत आहे…!

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on