Homeबातम्याबारामतीकर तुम्ही कोणाकडे श. प. का अ . प. कडे या...

बारामतीकर तुम्ही कोणाकडे श. प. का अ . प. कडे या चर्चावर मात्र गप्प …!

बारामतीकर तुम्ही कोणाकडे श. प. का अ . प. कडे या चर्चावर मात्र गप्प …!

अनेक बारामतीकरांना विचारल्यावर नो कमेंट्स …तर बारामतीकर श. प. का अ . प. चर्चावर गप्प …!

संतोष शिंदे : संपादक भावनगरी

बारामतीकर शरद पवार व अजित पवार चर्चेवर गप्प राहून सावध भूमिकेच्या पवित्र्यात…!

अजिदादांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे जात सत्ताधार्याशी हातमिळवणी करत सत्तेत सामील होऊन शरद पवार यांच्या विचारांशी फारकत घेऊन राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह आपलच असल्याचा पक्षावरही दावा ठोकून मोकळे झालेले असून ते साध्य करत. आजवर राजकीय षडयंत्र सर्वसामान्यांच्या विचारांच्या पलीकडचे आहे यात शंका नाही.
बारामतीच्या राजकारणालां वेगळे वळण निर्माण झालेले आहे.

ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष व अजित दादा पवार यांच्यावर आधारित असलेल्या विश्वास सार्थकी लावायचे ते बारामतीकर मात्र नक्कीच सध्याच्या राजकीय परिस्थितीत तेरी भी चूप ,मेरी भी चूप च्या माध्यमातून गप्पंच राहून चर्चा न झालेली चांगली नसता ते आत्मधून एकत्रित असतील व आपण काही बोलायचे तर अडचणीत येऊ…अश्याची चर्चा चौका चौकात आता पहायला मिळते.
बारामतीच्या सर्वांगीण विकासात्मक चर्चेमध्ये आता वेगळे वळण मिळाले असून राजकारणी व राजकारणात बारामतीकर मशगुल होताना दिसत नाहीत. तर नवनिर्वाचीत विषयावर मनोगत व्यक्त केले तर काही वेगळा मॅसेज जाईल. दोन्ही डग्रिवर हात ठेऊन सावधानात्मक चर्चेला प्राधान्य देतात.

जुनी संस्थाने ,कारखानदारी, कॉलेजेस अनेक जुन्या जाणत्या लोकांशी असलेले संबंध या सर्वांमध्ये पवार साहेबांचे ते वलय तो आदर कायम असलेले व ते नव्याने सर्व सूत्रे अजितदादा पवार यांनी यापूर्वी आपल्या हातून राबवल्यामुळे , नव्याने विकसित बारामती व तालुक्याचा विकास आत्मक दर्जेदार विकास कामे नव्याने जोडलेले कार्यकर्ते नवीन तरुण फळी तालुक्यात वेगळा विकासात्मक वलय निर्माण करणारे अजित दादांचा नक्कीच पलडा त्यामुळे भारी वाटत असला तरी वडीलकीच्या नात्याने शरद पवार साहेबांचा ही विचार सोडून चालनार नाही. दोघांचेही समांतर वजन बारामतीच्या मतदारसंघावर असल्याकारणाने दोघां पैकी कोणाला डावलायचं सुप्रिया सुळे -सुनेत्रा पवार अशी लढत होईल अशी चर्चा होऊ लागली आहे.

ननंद – भावजय यापैकी निर्णय घेण्यात अनंत अडचणी मतदारासमोर ही उभा असणार आहेत.

कोणाला आपलंसं करायचं यावर चर्चा होत नसून सर्वजण गप्प राहण्यावरच आपल्या शहाणपणा समजतात हे मात्र नक्की…

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on