पुणे (दि. २४): सुप्रसिद्ध अभिनेते रजा मुराद यांनी महाशिवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात “पुणे हे नुसते एक शहर नसून माझे दुसरे घर आहे” असे उद्गार काढले. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असताना पुण्याने त्यांना खूप मदत केली, तसेच बाळासाहेब दाभेकर यांसारख्या व्यक्तींनी सुरुवातीच्या काळात सहाय्य केले, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात रजा मुराद यांना शिवशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पठारे यांनाही शिवशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, अनिल येनपुरे, विवेक खटावकर, संदीप खर्डेकर, संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, तेजस्विनी दाभेकर, राजेंद्र पंडित, जगन्नाथ निवंगुणे, भीमसेन शेट्टी, कैलास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दरम्यान, मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘फोक लोक’ या लोकसंगीताच्या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.
