पुणे जिल्ह्यातील उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यांच्यासमवेत बारामतीकरांनी सायकल राईडचा अनुभव घेतला..

0
103

FIT INDIA MISSION अंतर्गत – सायक्लोथॉन

पुणे जिल्ह्यातील उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यांच्यासमवेत बारामतीकरांनी सायकल राईडचा अनुभव घेतला..

*रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ फिट इंडिया मिशन अंतर्गत .. “”#sundayoncycle”” आणि *#fitindiamission अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस , बारामती नगरपरिषद बारामती आणि बारामती सायकल क्लब यांच्या समवेत सकाळी ठीक ०६:३० वाजता..शारदा प्रांगण, भिगवण चौक, बारामती येथून या कार्यक्रमाला सुरुवात झाली, सर्वप्रथम पुण्यातून आलेल्या प्रेरणा जैन यांनी मेडिटेशन, हिलिंग आणि योगा याद्वारे सर्व उपस्थित त्यांना मार्गदवर्शन केले तर नंतर पुणे जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे एसपी श्री संदीपसिंग गिल यांच्यासमवेत, श्री गणेश बिडकर अतिरिक्त जिल्हा अधीक्षक अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिरादार , सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, तसेच श्री नाळेसाहेब, पोलीस निरीक्षक बारामती शहर आणि श्रीमती वैशाली पाटील पोलीस निरीक्षक बारामती यांच्या समवेत बारामती सायकल क्लबचे असंख्य सदस्य आणि पोलीस कर्मचारी अशा साधारण 300 सायकल स्वरांनी या दहा किलोमीटर सायकलोथॉन मध्ये भाग घेतला होता*
सदरच्या सायकल राईड करिता सुरुवात शारदा प्रांगण- भिगवण चौक – इंदापूर चौक – गुणवडी चौक – गांधी चौक- पुन्हा भिगवण चौक – भिगवण रोड मार्गे – एमआयडीसी – पेन्सिल चौक – विद्या प्रतिष्ठान – रुईपाटी जवळून पुन्हा भिगवण रोड मार्गे- शारदा प्रांगण ,भिगवण चौक , बारामती येथे समाप्ती.. असा १० किलोमीटर चा मार्ग असेल

रॅली समाप्तीनंतर शारदा प्रांगण येथे सायकल रॅली मध्ये भाग घेणाऱ्या सर्वासाठी आकर्षक सर्टिफिकेट पोलीस अधिकारी यांचे हस्ते वाटप झाले आणि सोबत अल्पोपहार होता

यावेळी बारामती शहर तालुका परिसरातून बरेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सायकल सह या सायकल राईडला हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here