नटराज नाट्यकला मंडळ च्या वतीने बारामती गणेश फेस्टिवल २०२३ मध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन…

नटराज नाट्यकला मंडळ च्या वतीने बारामती गणेश फेस्टिवल २०२३ मध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन…

0
196

बारामती प्रतिनिधी : नटराज नाट्यकला मंडळ च्या वतीने बारामती गणेश फेस्टिवल २०२३ मध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन…

यंदा बारामतीकरांना बारामती गणेश फेस्टिव्हल २०२३ मध्ये यावर्षी बहारदार कार्यक्रमाची मेजवानी…

अजितदादा पवार यांनी २००२ मध्ये बारामती गणेश फेस्टिव्हलची सुरुवात केली यावर्षी फेस्टिव्हलचे (कोविड वर्ष वगळता) सलग २१ वे वर्ष आहे. या वर्षीचा गणेशोत्सव दि १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे दि २३ सप्टेंबर रोजी सपत्नीक फेस्टिव्हलला उपस्थित रहाणार आहेत.

बारामती गणेश फेस्टिव्हलच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना मंगळवार दि १९ रोजी सकाळी १० वाजता उपविभागीय अधिकारी श्री वैभव नावडकर यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ७ वाजता भिमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांच्या “माझे माहेर पंढरी” हा भजन -भक्तीगीतांचा कार्यक्रम दि २० रोजी ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन दि २१ स्वरनिनाद प्रस्तुत ऑर्केस्ट्रा “सत्यम शिवम सुंदरम दि २२ पूनम कुडाळकर यांचा मराठी लावणी नृत्याचा कार्यक्रम “या रावजी बसा भावजी” दि २३ मराठी नाटक करून गेलो गाव” या मध्ये अभिनेते भाऊ कदम व ओंकार भोजने यांच्या भूमिका आहेत. रविवार दि २४ रोजी महिला वर्गाच्या मागणी नुसार महिलांकरिता स्वतंत्र लावण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन दुपारी ४ वाजता माया खुटेगावकर यांचा भारदार लावण्याचा कार्यक्रम “आहो नादाच खुळा आयोजित करण्यात आलेला आहे. व हाच कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता सर्वांकरीताही खुला आहे. या कार्यक्रमात संगीता लाखे, प्राची मुंबईकर, अर्चना जावळेकर, नमिता पाटील हे लावणी नृत्य सादर करणार आहेत. दि २५ “प्यार महोब्बत और हसरते” हा हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा दि २६ रोजी “रेट्रो ते मेट्रो” हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा दि २७ रोजी दुपारी ४ वाजता स्थानिक कलावंतांचा “कन्ऱ्हेचे कलावंत कार्यक्रम व संध्याकाळी ७ वाजता आमदार अमोल मिटकरी यांचे “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज” या विषयावर व्याख्यान दि २८ रोजी सकाळी १० वाजता पालखी मधून विसर्जन मिरवणूक होणार आहे. हे सर्व कार्यक्रम नटराज नाट्य मंदिर येथे होणार असून सर्व नागरिक बंधू भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती किरण – गुजर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here