दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन

0
3

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन
बारामती, दि. २२ जुलै : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खासदार पार्थ पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पुत्र जय पवार, सून ऋतुजा पवार आदी उपस्थित होते.

यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. त्यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना श्रीमती पवार यांनी व्यक्त केली.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here