ग्रामपंचायत अंजनगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी राजू बबन वायसे तर लालासाहेब हनुमंत कुचेकर उपाध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड..!

0
5

प्रतिनिधी : ग्रामपंचायत अंजनगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी राजू बबन वायसे व लालासाहेब हनुमंत कुचेकर उपअध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड
दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत अंजनगाव येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी मंगेश वायसे, प्रशांत कुचेकर, लालासो कुचेकर आणि राजू वायसे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत तिघांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे राजू बबन वायसे यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी, तर लालासो हनुमंत कुचेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
गावात कोणत्याही प्रकारचे तंटे होणार नाहीत आणि ग्रामस्थांमध्ये एकमेकांत सलोख्याचे व गुण्यागोविंदाचे संबंध राहतील, यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष राजू वायसे यांनी दिली.
सदर ग्रामसभा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here