ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.

0
5

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.
: दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, बारामती येथे विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ क्रीडा प्रशिक्षक श्री राजेंद्र करणे सर यांच्या हस्ते भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. रणजीत देवकर सर यांनी केले. यावेळी हॉकी खेळाडू श्रावणी कदम व निसर्गा कांबळे हिने मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीविषयी व भारतीय हॉकीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी उपस्थित खेळाडूंना थोडक्यात माहिती दिली.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, सांघिक भावना, खेळाडूवृत्ती आणि क्रीडाभावना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवनशैली घडविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे मा. चेअरमन श्री राजेंद्र पवार व विश्वस्त मा. सौ .सुनंदा पवार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व विभागातील प्राचार्य, विभाग प्रमुख, क्रीडा शिक्षक,प्रशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयीची आवड, उत्साह आणि क्रीडाभावना अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here