
खासदार सुनेत्रा पवार यांच्या संयोजनाखाली मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला….!
बारामतीमध्ये दि.२९ जानेवारी रोजी खासदार सुनेत्रा पवार यांच्या संयोजनाखाली मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे ठिकाण सहयोग बंगला, सहयोग सोसायटी होते. या निमित्ताने बारामतीच्या कानाकोपऱ्यातून महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

महिला भगिनींनी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत संवाद साधला आणि त्यांच्यासोबत छायाचित्रेही घेतली. संक्रांतीच्या वातावरणात महिलांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह दिसून आला. कार्यक्रमात पर्यावरणाचे महत्त्व निमित्त कापडी पिशव्यांचे तिळगूळ, लाडू आणि वाणाचे वितरण करण्यात आले.

सुनेत्रा पवार यांनी महिलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत त्यांचे आभार मानले व सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग अधिक वाढावा, असे आवाहन केले.