कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय

0
187

कारभारी जिमखाना क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित स्पर्धेसाठीच्या 19 वर्षाखालील गटातील पात्रता फेरीतील दोन दिवसांचे (2 Days) सामने बारामती येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम बारामती येथे सुरू असून सदर सामन्या अंतर्गत कारभारी जिमखाना क्रिकेट क्लब बारामती यांचा सामना पुणे येथील विसडम (Wisdom) क्रिकेट अकॅडमी या नामवंत संघाबरोबर दिनांक 29 व 30 जानेवारी 2023 रोजी पार पडला.
बारामतीच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकाराचे सामने खेळण्यामध्ये कोणताही संघ सहभागी झालेला नव्हता परंतु कारभारी जिमखाना चे सर्वेसर्वो श्री. प्रशांत (नाना) सातव यांनी अल्पावधीमध्ये बारामती मधील उत्कृष्ट क्रिकेट खेळणारे 19 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी घेऊन संघाची बांधणी केली व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित स्पर्धेसाठीच्या 19 वर्षाखालील गटातील पात्रता फेरीतील दोन दिवसांचे (2 Days) सामने खेळण्याची संधी बारामतीमधील क्रिकेटपटूंना उपलब्ध करून दिली.


या सामन्यामध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट क्लबने प्रथम नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सक्षम काटे (13-5-46-5), सुदर्शन तोरडमल (14-3-61-2) यांच्या गोलंदाजी समोर विसडम ;ॅपेकवउद्ध पुणे संघाच्या अतिश राठेड (64 धावा) व रबी बडदे (68 धावा) यांनी केलेल्या भागीदारीमुळे पहिल्या दिवसामध्ये विसडम संघाने 9 बाद 236 धावांवर त्यांचा डाव घेषीत करून कारभारी जिमखाना संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
प्रतिउत्तरादाखल कारभारी जिमखाना संघातर्फे फलंदाजी करताना शाश्वत आटोळे (84 धावा), अर्थव काशिद (55 धावा), अर्थव बोराडे (25 धावा) यांच्या फलंदाजीमुळे कारभारी जिमखाना संघाने सर्वबाद 202 धावा केल्या सामन्याच्या दुसÚया दिवशी पुन्हा एकदा सुर्दशन तोरडमल (10-2-26-1), सक्षम काटे (10-2-49-3) व शाश्वत आटोळे (5-0-21-2) यांच्या भेदक गोलंदाजीमुळे विसडम संघाने 8 बाद 167 धावांवर डाव घोषित करून 202 धावांचे आवाहन कारभारी जिमखाना संघासमोर ठेवले ते आवाहन पेलताना अर्थव काशिद (53 धावा), रोहन जाधव (49 धावा), चिराग अहुजा (28 धावा), सुदर्शन तोरडमल (26 धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे निर्धारीत षटकांमध्ये कारभारी जिमखाना क्रिकेट संघाला बारामती व पंचक्रोशितील न भुतो न भविष्यती असे दैदिप्यमान ऐतिहासिक विजय संपादन करता आला.

सदर सामन्याचा मानकरी सक्षम काटे यास घोषित करण्यात आले.
याकरीता प्रशिक्षक म्हणुन श्री. सचिन माने, सौरभ दळवी, इम्रान पठाण, हैदर तांबोळी तसेच नितीन सामल, संजय हाडके व विनोद यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ऐतिहासिक विजय मिळविल्यामुळे श्री. प्रशांत (नाना) सातव यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here