एसटी बस मध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन…?
प्रतिनधी:एसटीच्या इटीआयएम मशिनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुटया पैशावरून प्रवाशी व वाहकांमध्ये होणारे वाद याला आळा घालण्यासाठी लालपरीमध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन देण्यात येणार आहेत.त्यामुळे वाहक आता स्मार्ट होणार असून खिशात रोख पैसै नसतानाही एसटीतील प्रवाशांना आता आपल्या मोबाईलवरील गुगल -पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून डिजिटल तिकीट काढता येणार आहे.
सदोष मशिनमुळे अनेकदा एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी असताना कोर्या कागदावर तिकीट लिहून देण्याची वेळ वाहकांवर येते. त्यामुळे महामंडळानेही वाहकांच्या डोक्याला तापदायक ठरलेल्या जुन्या तिकीट इश्यू मशीन हद्दपार करून त्या जागी आता नवीन इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे…!