एसटी बस मध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन…?

0
153

एसटी बस मध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन…?

प्रतिनधी:एसटीच्या इटीआयएम मशिनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुटया पैशावरून प्रवाशी व वाहकांमध्ये होणारे वाद याला आळा घालण्यासाठी लालपरीमध्ये महामंडळामार्फत आता अँड्राईड तिकीट मशिन देण्यात येणार आहेत.त्यामुळे वाहक आता स्मार्ट होणार असून खिशात रोख पैसै नसतानाही एसटीतील प्रवाशांना आता आपल्या मोबाईलवरील गुगल -पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून डिजिटल तिकीट काढता येणार आहे.

सदोष मशिनमुळे अनेकदा एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी असताना कोर्‍या कागदावर तिकीट लिहून देण्याची वेळ वाहकांवर येते. त्यामुळे महामंडळानेही वाहकांच्या डोक्याला तापदायक ठरलेल्या जुन्या तिकीट इश्यू मशीन हद्दपार करून त्या जागी आता नवीन इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे…!

Previous articleराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
Next articleविठू.. भाकरी देतोया
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here