एमआयडीसी क्ष्रेत्रातील रस्ते अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी … धनंजय जामदार

0
155

एमआयडीसी क्ष्रेत्रातील रस्ते अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी … धनंजय जामदार

बारामती एमआयडीसी क्षेत्रात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल मॅनूफॅक्चरर्स असोशिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली आहे. बारामती एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून अनेकांनी जीव गमावले आहेत. अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणेबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश मोढवे, बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, आरटीओ बारामतीचे प्रमुख परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर , बारामती इंडस्ट्रीयल मॅनूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार सचिव अनंत अवचट सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, उद्योजक विजय जाधव आदी मान्यवर बैठकीस उपस्थित होते.

एमआयडीसीत वारंवार रस्ते अपघात होणारे ठिकाणे व त्यामागील कारणे याबाबत पोलिस विभागाने अहवाल तयार केला असून त्याचा अपघात प्रतिबंधासाठी उपयोग केला जाणार असलेची माहिती पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी यावेळी दिली.

बारामती औद्योगिक क्षेत्रातून होणारी कंटेनर , डंपर , ट्रेलर आदि अवजड वाहनांच्या अनियंत्रित वेगाला व बेशिस्त वाहतुकीस परिवहन विभाग कठोर कारवाई करणार असलेचे मुख्य परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी बैठकीत सांगितले .

बारामती इंडस्ट्रियल मॅनूफॅक्चरर्स असोसिएशनने एमआयडीसीतील रस्ते अपघात रोखण्यासाठी गतिरोधक रंबलार्स, ब्लिंकर्स जागोजागी बसवणेची केलेली मागणी योग्य असून परिवहन व पोलिस विभागाची मान्यता घेऊन बारामती औद्योगिक क्षेत्रात जागोजागी स्पीड ब्रेकर्स व इतर उपाययोजना करण्याचे काम सत्वर हाती घेण्यात येईल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता निलेश मोढवे यांनी बारामती इंडस्ट्रियल मॅनूफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here