उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बारामती एमआयडीसीत उद्योजकांचा मेळावा – धनंजय जामदार
बारामती MIDC व परिसरातील लहानमोठ्या उद्योगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी, बारामतीच्या औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबी शासनासमोर मांडण्यासाठी, बारामती एमआयडीसी मध्ये पुढील काही महिन्यात औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये शासनाचा सहभाग निश्चित करण्यासाठी, असोसिएशनच्या वेबसाइटचे अनावरण तसेच स्वतःचा उद्योग नाविन्यपूर्ण व उत्कृष्टपणे करणाऱ्या लघुउद्योजकांना पारितोषिक देऊन प्रोत्साहित करणे, Export निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या लघुउद्योगांचा सन्मान करणे अशा अनेक बाबींचा समावेश करून बारामती एमआयडीसी मध्ये लवकरच उद्योजकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांना निमंत्रण देण्यात आले असलेची माहिती बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.
असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशाह शेख वकील, सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, हरिभाऊ थोपटे, संभाजी माने, हरीश कुंभरकर, चंद्रकांत नलवडे, सूर्यकांत रेड्डी, विष्णू दाभाडे, राजन नायर, हरीश खाडे, सौ चारुशीला धुमाळ, सौ उज्ज्वला गोसावी व अभिजित शिंदे हे असोसिएशनचे पदाधिकारी हे परिसरांतील उद्योजकांशी सातत्याने संवाद साधत असून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. उद्योजकांकडून प्राप्त सूचना व प्रश्न मेळाव्यामध्ये मंत्रिमहोदयांकडे मांडून ते सोडवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न करण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्योजक मेळाव्यासाठी लवकरच तारीख व वेळ निश्चित करण्यात येणार असून बारामती परिसरातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.