इंदापूर तालुक्याचे आरोग्यदूत म्हणून ओळख असणारे भूषण सुर्वे यांची शिवसेना वैद्यकीय महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड..!

0
27

शिवश्री भूषण सुर्वे – संस्थापक/अध्यक्ष: इंदापूर तालुक्याचे आरोग्यदूत म्हणून ओळख असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे विशेष कार्य-अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांचे विश्वासू असणारे शिवश्री भूषण सुर्वे यांची नुकतीच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. गेली ६ ते ७ वर्षापासून ते मंगेश चिवटे यांच्या सोबतीने वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

सोबतच ते संस्थापक अध्यक्ष म्हणून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या माध्यमतून ७०० पेक्षा जास्त रक्तदान शिबिरे घेत १५०० पेक्षा जास्त रुग्णांना महाराष्ट्रामध्ये मोफत रक्त उपलब्ध करून दिले आहे. आणि हे काम करत असताना *मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्वे यांनी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळात *मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून सुमारे ३०० पेक्षा जास्त रुग्णांना १ कोटी १५ लाखांपेक्षा जास्त निधी मंजूर करून दिला आहे*, त्यामुळे या सर्व कामांचा तपशील पाहता पुन्हा एकदा मंगेश चिवटे व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी सुर्वे यांच्यावर विश्वास दाखवत पुणे जिल्ह्यातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्र राज्यकार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याचसोबत सुर्वे हे महाराष्ट्र राज्याच्या सोशल मीडिया पदी असून वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचा आणि माहितीचा आढावा, वैद्यकीय बाबत असलेल्या योजना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत असतात.

या निवडीवरून सुर्वे यांचे पुणे जिल्हा व संपूर्ण तालुक्यातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच यापुढील काळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खा. डॉ. श्रीकांत दादा शिंदे साहेब, मंगेश चिवटे साहेब व राम राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून यापेक्षा अधिक जोमाने रुग्णसेवा करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचवण्याचे काम करू असे सुर्वे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here