आदरणीय……सपना सतीशराव ननवरे (मॅडम): आदर्श व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

0
20

आदरणीय……सपना सतीशराव ननवरे (मॅडम): आदर्श व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या अथक मेहनतीने, समर्पणाने आणि समाजसेवेच्या भावनेने आपण स्वतःला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सिद्ध केले आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी घेतलेली जबाबदारी कौतुकास्पद आहे. आपण दिलेली सकारात्मक प्रेरणा आणि उभा केलेला आदर्श हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरतो.

बारामती स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य आणि युवकांसाठी निर्माण केलेले मंच यामुळे समाजामध्ये क्रीडाविषयक जागरूकता वाढली आहे. “आयर्न मॅन ते ऑलिम्पिक” ही संकल्पना आपण खऱ्या अर्थाने कृतीत आणली आहे. आपल्या नेतृत्वगुणांमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आणि समाजाने आपल्याकडून एक नवीन दृष्टिकोन घेतला आहे.

बीएसएफच्या माध्यमातून केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर मानसिक आणि शारीरिक सुदृढतेसाठी विविध उपक्रमांची आखणी करून,एक अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांनी यशाचे शिखर गाठले आहे.

आपल्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले, तर एक आदर्श गृहिणी, आई आणि पत्नी म्हणून आपण आपल्या कुटुंबाला नेहमीच प्रेरित केले आहे. सतीश ननवरे ट्रिपल आयर्न मॅन, अभिषेक, आणि वैष्णवी यांच्या यशामध्ये आपले योगदान खूप मोलाचे आहे.

आपल्या कर्तृत्वाला व नेतृत्वाला मानाचा मुजरा करत, आपल्याला वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना की आपणास दीर्घायुष्य, चांगले आरोग्य आणि आनंदमय जीवन लाभावे. आपल्या पुढील सर्व यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

आपण नेहमी यशस्वी राहा युवा पिढीला मार्गदर्शन प्रेरणा द्यावी, आपल्या हातून उत्तम उत्तम देशसेवा घडो हीच अपेक्षा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here