“अल्ट्रामॅन’ स्पर्धा पूर्ण करणे आयऱ्या – गहिरयाचं काम नाही व ते पूर्ण केले आपल्या बारामतीच्याचं अवधूतने…!

0
164

२१ वर्षीय बारामतीकर अवधूत शिंदे बनला ‘अल्ट्रामॅन’

बारामती अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करण आयऱ्या गहिरयाचं काम नाही व ते पूर्ण केले अपल्या बारामतीच्या अवधूतनेच..तेही ऑस्ट्रलियात.. अल्ट्रामॅन ठरला.. जिद्द चिकाटी मेहनत व आपल्या विचारांच्या खेळाशी प्रामाणिक तत्वाच्या जोरावर अवधूत सुधीर शिंदे याने ही स्पर्धा पूर्ण करून बारामतीचे नाव लोकिकास पात्र केले..

ऑस्ट्रेलियात झालेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत बारामतीच्या २१ वर्षीय अवधूत सुधीर शिंदे याने हे यश संपादन केले आहे. शारीरिक क्षमतेचा कस लागणाऱ्या या जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत अवधूत शिंदे याने सायकलिंग स्विमिंग रनिंग तिन्ही स्पर्धाच्या खेळामध्ये पराक्रम करत बारामतीचा नावलौकिक उंचावला आहे. ‘आयर्नमॅन’ व ‘अल्ट्रामॅन’ अशा दोन्ही स्पर्धा पूर्ण करणारा अवधूत शिंदे हा पहिलाच बारामतीकर ठरला आहे.

तीन दिवसांत प्रत्येकी १२ तासांप्रमाणे ही स्पर्धा होते. यात १० किलोमीटर स्विमींग, ४२१ किलोमीटर सायकलिंग व ८४ किलोमीटर धावणे यांचा समावेश असतो. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात तो सध्या शिक्षण घेत आहे. यापूर्वी

कझाकिस्तान येथे मध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत त्याने सहभाग घेत यश संपादन केले होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून अवधूतने यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. स्विमींग, सायकलिंग व रनिंग अशा तिन्हींचा त्याने सराव केला होता. बांधकाम व्यावसायिक सुधीर शिंदे यांचा अवधूत हा मुलगा आहे. आई-वडिलांनीही अवधूतला या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले. तर कोल्हापूरचे पंकज रावाळू यांनी अवधूतला मार्गदर्शन केले. दर रविवारी २५० किलोमीटर सायकलिंगचा तो सराव करत होता. बारामती सायकल क्लबचे प्रमुख अँड. श्रीनिवास वायकर यांचे त्याला सातत्याने सहकार्य मिळाले.तर बारामती ही तो अनेक सायकल पटूंशी रनर शी स्विमरसी तो चर्चा करत असत व मार्गदर्शनही करत असत त्याच्यात असे काही वेगळे करून दाखवण्याचे तो बोलत असे बारामती स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून वारसा लाभलेला आहे व त्याने “अल्ट्रामॅन’ किताब घेऊन करून दाखवले असे त्याचे सोबती भावनगरी शी बोलताना सांगत…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here